24.3 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताय? सावधान! काळजी घ्या

ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताय? सावधान! काळजी घ्या

Google News Follow

Related

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीला उधाण येते. परंतु अशी खरेदी करताना सावध खूपच राहावे लागते नाहीतर फसवणुकीची दाट शक्यता असते. ऑनलाइन वस्तू आल्यानंतर ही वस्तू उघडताना आपण काही काळजी घ्यायलाच हवी. मुख्य म्हणजे नानाविध सेलच्या जाहीराती आपल्याला भूरळ पाडतात. त्यामुळे आपण लगेच वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून बुकिंग करतो. फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली मात्र फसवणूकीची दाट शक्यता असते.

खासकरून सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांनी फेस्टिव्हल ऑफरमध्ये घेतलेल्या वस्तूंबाबत काही खबरदारी घ्यायला हवी. अन्यथा त्या पार्सलमध्ये भलतेच काही निघू शकते. दुसरी एखादी वस्तू पाठवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सध्या निदर्शनास येत आहे. त्यामुळेच आता ऑनलाइन आलेले पार्सल उघडताना, तुम्ही या पार्सलचा व्हिडीओ बनवा. म्हणजे फसवणूक झाल्यास तुम्हाला सायबर सेलकडे रीतसर तक्रार नोंदविता येईल.

वस्तू आल्यानंतर हा अशा पद्धतीने काढला जाणारा व्हिडीओ हा तुमच्याकडे पुरावा असणार आहे. त्यामुळे पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी दगड, साबण किंवा इतर तत्सम गोष्टी आढळली तर तुमच्याकडे पुरावा राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमल्यास, पार्सल घेतल्यानंतर कुरिअर बॉयसमोर किंवा रिटेलरसमोर उघडून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे. त्यामुळे त्यांच्यासमोर व्हिडीओ काढल्यानंतर फसवणुकीची शक्यता कमी होते. तरीही तुमची फसवूणक झाली तर तुमच्याकडे संबंधित कंपनीकडे किंवा त्या ठराविक रिटेलरकडे तक्रार करण्याचा मार्ग आहेच.

हे ही वाचा:

नौशेरामध्ये दोन जवान हुतात्मा

चीनच्या नव्या कुरापती, नदी प्रदूषित करण्याचा डाव

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

 

सध्याच्या घडीला या अशा तक्रारी खूप वाढू लागलेल्या आहेत. त्यामुळे आता अशी खरेदी करताना तुम्ही तुमच्याकडे पुरावा ठेवणे आता गरजेचे झालेले आहे. दिवाळीच्या काळात नवनवीन योजना तसेच सेलचे अमिष ग्राहकांना दाखवले जाते. यातून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. म्हणूनच अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करणे केव्हाही हिताचे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा