29 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरक्राईमनामानसरल्लाच्या समर्थनार्थ शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मोर्चा काढणाऱ्यांवर कारवाई करा

नसरल्लाच्या समर्थनार्थ शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मोर्चा काढणाऱ्यांवर कारवाई करा

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह चार पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल

Google News Follow

Related

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हिजबुल्ला संघटनेचा म्होरक्या सय्यद हसन नसरुल्ला याला इस्रायलने ठार केले. हिजबुल्लाला अमेरिका आणि अन्य ६० देशांनी ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केलेले आहे. मात्र, पुण्यातील जुन्नर तालुक्यात हसन नसरूल्ला या दहशतवाद्याला ‘मानवतेसाठी लढणारा शहिद’ असल्याचा दाखवून मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले. ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पवित्र दिवशी ‘काळा दिन’ साजरा करण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यानंतर असे कृत्य करणाऱ्या सूत्रधारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ने केली आहे.

शिवछत्रपतींच्या शिवनेरी किल्ला असलेल्या जुन्नर जन्मगावी देशविघातक आणि देशद्रोही कृत्य करणार्‍या मुख्य सूत्रधाराला शोधून सर्व दोषींच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली आहे. या सदंर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तसेच तळेगाव, मंचर आणि कोल्हापूर शहारातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

नसरल्लाला ठार केल्यानंतर भारतातील जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये याचा शोक म्हणून मोर्चे काढण्यात आले होते. तसेच कॅण्डल मार्चही काढण्यात आले होते. महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावातील सय्यदवाडा येथेही नसरल्लाचे उदात्तीकरण केल्याचे प्रकार समोर आला आहे. काही समाजकंटकांकडून मोठे होर्डिंग्ज लावून ‘मानवतेसाठी लढा देणारे ….शहिद’ म्हणून हसन नसरल्ला या दहशतवाद्याचे उदात्तीकरण करण्यात आले. तर इस्रायल आणि अमेरिका या भारताच्या मित्र देशांना दहशतवादी म्हणून संबोधले आहे.

हे ही वाचा..

राजकीय प्रचारासाठी होर्डिंग्जच्या सक्तीच्या वापरामुळे जाहिरात उद्योग अडचणीत

आमच्याकडे शत्रूंना घुसून मारण्याची क्षमता

दहशतवादी यासिन मलिक म्हणतो बंदूक सोडली, आता मी गांधीवादी!

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

जुन्नर येथे हसन नसरल्ला याच्या समर्थनार्थ बॅनरबाजी कोणी आणि का केली? हे कृत्य करणार्‍याचा हेतू काय होता? त्यांना अर्थपुरवठा कोठून झाला? ३ ऑक्टोबरला दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून घोषणाबाजी कोणी आणि का केली? त्याची त्यांनी रितसर पोलीस परवानगी घेतली होती का? असे प्रश्न हिंदु राष्ट्र समन्वय समितीने तक्रारीमध्ये उपस्थित केले आहेत. दहशतवादी कृत्यांचे उदात्तीकरण करून भारताच्या मित्र देशांविरूध्द समाजात विष आणि द्वेष पेरण्याच्या उद्देशाने हे देशविघातक कृत्य केलेले आहे. अशा प्रकारचे कृत्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्याने पावन झालेल्या जुन्नर येथे केलेले असून ते महाराष्ट्र आणि देशाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. हसन नसरल्ला या दहशतवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे पोलीस- प्रशासनाला लज्जास्पद आहे. पोलीस-प्रशासनाने याविषयी तातडीने कठोर कारवाई करावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा