टिल्लू ताजपुरीयाच्या निर्घृण हत्येनंतर तरी संपेल का खुनी संघर्ष

महाविद्यालयीन शत्रुत्व ते ३० हून अधिक हत्या

टिल्लू ताजपुरीयाच्या निर्घृण हत्येनंतर तरी संपेल का खुनी संघर्ष

तिहार तुरुंगातील गँगवॉरमध्ये दिल्लीचा कुख्यात गुंड सुनील टिल्लू ताजपुरीया याची निर्घृण हत्या झाली आणि एक दशकाहून चाललेल्या टोळीच्या भांडणाने विराम घेतला. दिल्ली विद्यापीठाच्या श्रद्धानंद महाविद्यालयातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या क्षुल्लक हाणामारीतून सुरू झालेले भांडण जवळपास एक दशकभर सुरू होते. या दरम्यान २५ ते ३० हत्या आणि हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या. यात अनेक निष्पापांचाही बळी गेला. आता यातील कुख्यात गुंड सुनील टिल्लू तजपुरिया याचा तिहार तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर तरी हा संघर्ष संपेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

 

ताजपुरिया याची तिहार तुरुंगात हत्या करण्यात आली. गोगी गँगच्या माणसांनी त्याच्यावर लोखंडी रॉड आणि बर्फ फोडण्याच्या हत्याराने हत्या करण्यात आली होती.

 

सन २०१०च्या निवडणुकीत विद्यार्थी दशेत असताना तजपुरिया आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी, जितेंद्र गोगी हे एकमेकांच्या विरोधी उमेदवारांना पाठिंबा देत होते. निवडणूक झाल्यानंतर गोगी याच्या चुलत बहिणीचा छळ केल्याच्या आरोपावरून गोगी आणि त्याच्या मित्रांनी तजपुरियाच्या मित्राची हत्या केली. याचा बदला म्हणून तजपुरियाने सन २०१५मध्ये गोगी याच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे टोळीयुद्धाला सुरुवात झाली.

 

गोगीला अटक करण्यात आली, परंतु सन २०१६मध्ये तो कोठडीतून पळून गेला आणि हत्यासत्र सुरूच राहिले. मार्च २०२०मध्ये, गोगी याला त्याच्या दोन साथीदारांसह गुडगावमध्ये पकडण्यात आले. सप्टेंबर २०२१मध्ये तजपुरियाच्या शूटर्सनी न्यायालयात गोगी या त्याच्या कट्टर शत्रूला गोळ्या घालून ठार केले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात शूटर्सचाही मृत्यू झाला आणि तुरुंगात बसून तो संपूर्ण कट आखून तो तडीस नेणाऱ्या ताजपुरियाला या प्रकरणात अटक करण्यात आली.

 

गोगीच्या टोळीला मोठा धक्का बसल्याचे दिसत होते परंतु गोगीचा उजवा हात दीपक पहल तथा ‘बॉक्सर’ने गोगीच्या टोळीची सूत्रे हाती घेतली. टोळीचा लगाम हाती घेत ‘बॉक्सर’ बाहेरून काम करत असताना, त्याच्या साथीदारांनी तुरुंगातील सूत्रे सांभाळली. गोगीने त्याच्या मृत्यूपूर्वी, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संधान बांधले होते. त्याच्या मृत्यूनंतरही हे नाते कायम राहिले. दरम्यान, बॉक्सरच्या मागे पोलिसांचा ससेमिरा वाढला आणि त्यानंतर तो जानेवारीत देश सोडून पळून गेला. त्याला मेक्सिकोमध्ये पकडण्यात आले आणि एप्रिलमध्ये परत आणण्यात आले. काही दिवसांत तो तुरुंगात परतला असता आणि ताजपुरिया टोळीचे पुढील लक्ष्य बनू शकला असता. परंतु असे घडायचे नव्हते.

हे ही वाचा:

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

एसआयटीने केला नरोडा हत्याकांड प्रकरणाचा तपास ‘एकतर्फी’

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशालाच ठोठावली शिक्षा!

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

गेल्या आठवड्यात तजपुरिया तिहारला परतला तेव्हा गोगीच्या गुंडांनी हल्ला करण्याचा निर्णय घेतला असावा. आता तजिपुरीयाची हत्या झाली असताना, गोगी टोळीच्या बॉक्सरचे वजन वाढले आहे. शिवाय, त्यांच्या मदतीला लॉरेन्स बिश्नोईचे गुंडही आहेत. या गुन्हेगारांना तुरुंगात वेगवेगळे ठेवणे अत्यावश्यक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे.

Exit mobile version