गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी त्यांच्या कोठडीत पुन्हा चौदा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून या प्रकरणी संजय राऊत यांना मुख्य आरोपी म्हटलं आहे. तर या आरोपपत्रात आणखी गौप्यस्फोट देखील करण्यात आले आहेत. या प्रकरणी आता संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकरांनी संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या दाव्यानुसार या घोटाळ्यातील पैसे संजय राऊत यांनी बनावट कंपन्यात वळवले आहेत. यासंबंधीचे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
‘राऊत यांनी राऊतस एंटरटेन्मेंट एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली. त्यात त्यांनी आपले बेहिशेबी पैसे वळवले. शिवाय एप्रिल २०२१ मध्ये मद्य व्यवसायाच्या एका कंपनीतही त्यांना स्वारस्य होते. तर अलीकडच्या काळात कुटुंबीयांच्या नावे बनावट कंपन्या सुरू करून त्यात बेहिशेबी पैसे वळवणे त्यांनी सुरू केले होते,’ असा दावा स्वप्ना पाटकर यांनी जबाबात केला आहे. या आरोपानंतर आता संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
कोरोना काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा गुजरातमध्ये
उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
दरम्यान, संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा मुक्काम ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहे. संजय राऊत यांच्या वतीने जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र, संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे.