संजय राऊत यांच्यावर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना अटक

संजय राऊत यांच्यावर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना अटक

शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर छळ करत असल्याचा आरोप करणारी महिला डॉ. स्वप्ना पाटकर हिच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट नसताना वांद्रयाच्या लिलावाती रुग्णालयात खोटे प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल तसेच क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट विषयावर पीएचडी केल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवणून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे.

डॉ.स्वप्ना पाटकर यांनी काही महिन्यापूर्वीच संजय राऊत यांच्यावर छळ करीत असल्याचा आरोप करून मला न्याय देण्यात यावा, असे पत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. संजय राऊत यांच्यावर आरोप करणारी महिला कोण आहे याबाबत राजकीय वर्तुळासह शिवसेनेत चांगलीच चर्चा रंगली होती.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी

आला रे आला…मुंबईत मुसळधार

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात

दहावी मूल्यांकन लांबणार; निकाल जुलैला

२०१६ पासून डॉ. स्वप्ना पाटकर या लीलावती रुग्णालायत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून नोकरी करीत होत्या. त्यांनी रुग्णालयात छत्रपती शाहू जी महाराज विश्वविद्यालय कानपूर येथून क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या विषयात पीएचडी केल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवून रुग्णालयात सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या जोरावर डॉ.पाटकर यांनी नोकरी मिळवली होती. काही महिन्यापूर्वीच रुग्णालयाने डॉ.स्वप्ना पाटकर यांना लीलावती रुग्णालय प्रशासनाने कामावरून कमी केले होते, अशी माहिती समोर येत आहे.

एप्रिल महिन्यात प्राणीमित्र संघटनेच्या तसेच गुजरी या गैरसरकारी संस्थेच्या पदाधिकारी गुरुदीप कौर सिंग याना त्याच्या घराजवळ  बंद लिफाफा मिळून आला होता. गुरुदीप कौर यांनी तो लिफाफा उघडून बघितला असता त्यात काही प्रमाणपत्राच्या नक्कल प्रती होत्या. गुरुदीप सिंग यांनी त्या तपासल्या असत्या त्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या प्रमाणपत्राच्या प्रति आढळून आल्या, त्या तपासल्या असता क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट विषयात पीएचडी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात व्याकरणातील काही चुका आढळून आल्या तसेच टायपिंग चुका देखील आढळून आल्यामुळे या सर्व पदव्या बोगस असल्याचे समोर आले.

डॉ. पाटकर यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःला क्लिकल सायकलॉजिस्ट असल्याचे सांगून रुग्णाच्या जीवाशी खेळत होत्या, अशी तक्रार तक्रारदार गुरुदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी बोगस दस्तवेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Exit mobile version