कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा संशयास्पद मृत्यु

तपास सीआयडीकडे

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा संशयास्पद मृत्यु

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलिसानी  संशयावरून ताब्यात घेतलेल्या मुलाला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या ६३ वर्षीय जेष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घडली. मृत व्यक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे. हे प्रकरण सीआयडीकडे तपासासाठी देण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. दीपक भंगारदिवे (६३) असे मृत्यु झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. दीपक भंगारदिवे हे कल्याण पूर्व येथे राहण्यास होते. कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री राबविलेल्या ऑल आऊट ऑपरेशनच्या दरम्यान दीपक भंगारदिवे यांचा २४ वर्षाचा मुलगा प्रशिक याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी    पोलीस ठाण्यात आणले होते. पोलिस मुलाला घेऊन गेल्याचे कळताच दीपक भंगारदिवे हे स्वतः शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात मुलाला सोडवण्यासाठी आले होते. हे ही वाचा: मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा ‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या प्रशिक याच्याकडे चौकशी करीत असताना दीपक भंगारदिवे हे त्याच्या मोबाईल फोन मध्ये शूटिंग करून पोलिसांसोबत हुज्जत घालत होते, दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवून ठाणे अंमलदार कक्षात आणून बसवले होते, त्या दरम्यान त्यांना फिट आली आणि ते कोसळले, त्यांना तात्काळ पोलिसांनी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.  ही सर्व घटना पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली असून सर्व सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग सीआयडी कडे देण्यात आले असल्याची माहिती गुंजाळ यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी करीत असल्याचे पोलिसानी सांगितले.  दरम्यान, या घटनेप्रकरणी स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला असून दीपक यांना पोलिसांनी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दीपक भंगारदिवे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याचे म्हटले आहे, व ते मुलाला सोडवण्यासाठी गेले असतांना कोळसेवाडी पोलिसांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप आव्हाड यांनी ट्विटरवर  केला आहे.

Exit mobile version