पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेवर कारवाई करण्यात आली आहे. या शाखेच्या बँक मॅनेजरवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. बँक मॅनेजर विनायक तलवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर विनायक तलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान झाले होते. त्याच्या आदल्या रात्री वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँकेची शाखा पहाटेपर्यंत सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. या संबंधित व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. तसेच आमदार रोहित पवारांनी बँकेतून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली.
पुणे मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) बारामतीच्या मतदानाच्या आदल्या मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करत व्यवस्थापकाचे निलंबन केले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केलं नाही. शिवाय त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागले असून त्यानुसार ब्रँचमध्ये ४० ते ५० लोक डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
जिवंतपणी काय मृत्यूनंतरही तुम्ही मला जमिनीत गाडू शकत नाहीत!
दाभोलकर हत्येच्या निकालातून काय समोर येणार?
नांदेडमध्ये आयकर विभागाची पाच ते सात ठिकाणी छापेमारी!
नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे, अजितदादांसोबत यावे!
लोकसभा निवडणुकीचा उत्सव सध्या देशात सुरू असून निवडणुकीचे तीन टप्पे यशस्वी पार पडले आहेत. तर, उर्वरित टप्प्यांसाठीची तयारी जोरदार सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचेही सर्व हालचालींवर बारीक लक्ष आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.