…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन

सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न

…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या झाली होती. यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून कारवाई सुरू असून याचं प्रकरणात नवा अपडेट समोर आला आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून बाबा सिद्दीकी यांची बॉलीवूड अभिनेता सलमानशी जवळीक असल्यानेच त्यांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले कॉन्स्टेबल श्याम सोनवणे यांनी त्यावेळी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. अंतर्गत तपासही सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य

विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी

ईडीकडून पीएफआयच्या ३५.४३ कोटी किंमतीच्या १९ मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यासह माजी आमदार गुलाब यादव यांना अटक

गेल्या शनिवारी रात्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी श्याम सोनावणे हे सिद्दीकींसोबत कर्तव्यावर होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला. मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version