इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्याला अटक

इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्याला अटक

काही दिवसांपूर्वी तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने ISIS च्या विचारसरणीसाठी भारतात काम करणाऱ्या तल्हा खान संशयिताला पुण्यातील वानवडी परिसरातून ताब्यात घेतले होते. एनआयएचे पथक तल्हा खानची दहशतवादी संघटनेशी संबंधात चौकशी करत होते. एनआयएच्या पथकाने अलीकडेच तल्हा खानच्या घराची झडती घेतली होती आणि कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले होते. या पुराव्यांची छाननी करून तल्हा खानला अटक करण्यात आली आहे.

ISIS च्या कारवायांमध्ये सामील असलेल्या एनआयएच्या पथकाने जहानजेब वानी, हिना बेग लोसादिया, अन्वर शेख आणि नबिल सिद्दीकी खत्री यांना एनआयएने जुलै २०२० मध्ये दिल्लीतून अटक केली होती. या सर्वांच्या चौकशीत तल्हा खान नबील सिद्दिकीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. याच कारणास्तव एनआयएचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून तल्हा खानवर लक्ष ठेवून होते. ७ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत एनआयएने तल्हा खानच्या घराची झडती घेतली आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले. या पुराव्यांची छाननी करून तल्हा खानला अटक करण्यात आली आहे.

जहाँजेब वाणी आणि हिना बेग हे पुण्यातील जिम चालवणाऱ्या खत्री आणि सादिया यांच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता. तर सादियावर भारतात ISIS कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. वानी आणि बेग हे हैदराबादच्या अब्दुल्ला बासितशीही जोडले गेले होते, ज्याला इसिसच्या अबू धाबी मॉड्यूलशी संबंधात अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

भाजपाचा गोव्याचा विजयाचा आनंद मुंबईमध्ये साजरा

आणि मुख्यमंत्री योगींनी रचला नवा विक्रम

फिर से आये भगवाधारी

याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांच्या पाठिंब्याने ISIS विचारसरणीचा प्रसार करण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे आणि लक्ष्यित हत्या घडवून आणणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version