लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटबाहेर होते दुकान

लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

राजस्थानमध्ये एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक केलेली व्यक्ती लष्कराचे गणवेश विकत असल्याची माहिती आहे. हा व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. आनंदराज सिंग (वय २२ वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे.

आनंदराज सिंग हा राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो लष्कराचे गणवेश विकण्याचा व्यवसाय करत होता. राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्याबाहेर आनंदराज सिंग गणवेशाचे दुकान चालवायचा. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या तीन महिलांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने लष्करासंदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी सिंग याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा..

“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”

दिल्लीत रस्त्यावरच्या नमाजाला घातला पायबंद!

अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही

ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!

गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आनंदराज सिंग हा सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्या बाहेर गणवेशाचे दुकान चालवतो. मात्र, काही दिवसांपासून तो आपले दुकान बंद करून बाहेर एका कारखान्यात कामाला होता. या काळात तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबधित महिलांच्या संपर्कात आला होता. सिंग हा त्याच्या स्रोतांकडून लष्कराची गोपनीय माहिती मिळवायचा. यानंतर ती माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेरांना सांगायचा. याबरोबरच अशी गोपनीय माहिती पाठवण्यासाठी आरोपीने पैशांची मागणीही केली होती. आनंदराज सिंग याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त चौकशीतून तांत्रिक माहिती मिळवण्यात आली. यानंतर त्याने वापरलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.” दरम्यान, अशा प्रकारच्या हेरगिरीच्या कारवायांवर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे संजय अग्रवाल यांनी सांगितले.

Exit mobile version