30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाभारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक

भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक

Google News Follow

Related

गेले काही दिवस फरार असलेला भारताचा कुस्तीपटु सुशील कुमार याला अखेरीस जालंधर येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी ५० हजार रुपयांचे इनाम ठेवले होते. एका युवा कुस्तीपटुच्या हत्येप्रकरणात सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक केल्याचे वृत्त आयएनएसकडून देण्यात आले आहे. सुशील कुमारच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

आज अखेर सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन अटक केली आहे. भारताला ऑलिम्पिकची दोन पदके जिंकवून देणारा एकमेव कुस्तीपटू अशी सुशील कुमारची ओळख आहे. एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूनंतर सुशील कुमार फरार झाला होता. सुशील कुमारला अटकपूर्व जामीनही मिळाला नव्हता. दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सुशील कुमारकडून एका युवा कुस्तीपटुच्या हत्येची घटना घडली होती. सागर कुमार हा भारताचा एक युवा कुस्तीपटू नवी दिल्लीमध्ये सराव करत होता आणि त्यानंतर तो आपल्या भाड्याने घेतलेल्या घरी राहायला जात होता. हे भाड्याचे घर ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारचे होते. काही दिवसांपूर्वी या सुशील कुमारने सागरला घर सोडून जाण्यास सांगितले होते. पण कदाचित सागर ही रुम सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे जेव्हा मंगळवारी रात्री सागरचा सराव संपला तेव्हा स्डेडियमबाहेर हा सुशील कुमार सागरशी बोलण्यासाठी तिथे आला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी सुशील कुमारबरोबर काही अन्य व्यक्तीही होत्या आणि त्यांनी सागरला मारहाण केली. या मारहाणीमध्ये सागर गंभीररीत्या जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली

लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का?

देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता

कोमट पाणी, कुजकट वाणी

सागरबरोबर असलेल्या मित्रांनाही यावेळी दुखापत झाली आहे. मंगळवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी पोलिसांना तीन व्यक्ती गंभीर असून त्यांना विनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी लगेच या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्याचबरोबर सागरबरोबर असलेल्या दोन मित्रांनाही जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी एका व्हिडीओमध्य सुशील कुमार तिथे असल्याचे पाहिले गेले होते. त्यामुळे दिल्ली पोलिस त्याला पकडण्याची तयारी करत होते. पण सुशील कुमार हा फरार झाला होता. अखेर सुशील कुमारला पंजाबमध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा