सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बहिणीने केली ही मागणी

सुशांतसिंग राजपूत हत्या प्रकरण पुन्हा तापले असून सुशांतच्या बहिणीने चौकशीची मागणी केली आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बहिणीने केली ही मागणी

चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्युप्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे, असा दावा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

यानिमित्ताने सुशांतसिंहच सुशांतची बहीण श्वेता कृति सिंगने सामाजिक माध्यमांवर भाष्य करून या पुराव्यांबद्दल लक्ष घालण्याची सीबीआयला मागणी केली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबाबत मुंबईतील कूपर रुग्णालयाचे कर्मचारी रूप कुमार यांनी नुकताच खळबळजनक खुलासा केला आहे.

यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूतला न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा काय?

कूपर रुग्णालयातील कर्मचारी रुपकुमार यांनी दावा केला आहे की, सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे. रुपकुमार यांचे म्हणणे आहे की, सुशांत च्या शरीरावर जखमा होत्या. २०२० साली सुशांतचे शवविच्छेदन रुपकुमार यांनी पहिले होते. कूपरच्या कर्मचाऱ्याच्या या मोठ्या दाव्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

हे ही वाचा:

तुनिशा मृत्यु प्रकरणी लव्ह जिहादच्या अनुषंगाने तपास

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला…

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

निष्पक्ष चौकशीची अपेक्षा

सुशांतची बहीण श्वेता कृती सिंहने मंगळवारी पुन्हा ट्विट करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियावर लिहिले की, या पुराव्यात जराजरी तथ्य असेल तर आम्ही कुटुंबीय सीबीआयला याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करतो. आमचा नेहमीच विश्वास आहे की तुम्ही लोक निष्पक्ष चौकशी कराल आणि आम्हाला खरे तथ्य सांगाल. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न मिळाल्याच्या वेदनेने आजही आपले मन दुखत आहे. यासोबतच तिने जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत हा हॅशटॅगही लावला आहे. रूग्णालयातील कर्मचारी रूप कुमार यांना तिने सुरक्षेची मागणीही केली आहे.

Exit mobile version