24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाअभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या नाही तर हत्या

अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या नाही तर हत्या

कूपर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूला दोन वर्षे उलटली असली तरी त्याचा मृत्यू कसा झाला याचे गूढ कायम आहे. १४ जून २०२० रोजी त्याने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. पण सुशांतची हत्या की आत्महत्या रहस्य अजून उलगडलेले नाही पण आता सुशांत सिंह प्रकरणाला नवे वळण लागले आहे. सुशांतने आत्महत्या नाहीतर त्याची हत्या झाली असल्याचा दावा करण्यात आल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे.

सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या झाली असल्याचा खळबळजनक दावा कूपर रुग्णालयाचे कर्मचारी रुपेश कुमार शाह यांनी केला आहे. माझ्या हिशोबाने एक टक्का ती आत्महत्या नव्हती हत्या होती. सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला त्यावेळी त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ,हाताला मुका मार लागल्यासारख्या खुणा होत्या. सुशांतच्या शरीरावर व्रण होते. सुशांतच्या गळ्याभोवती आत्महत्या केल्यासारखे व्रण नव्हते तर ते हत्येसारखेच दिसत होते,असा दावा कूपर रुग्णालयातील कर्मचारी रुपेश कुमार शाह यांनी केला आहे.

रुपकुमार शाह पुढे म्हणाले, सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना व्हिडिओ काढण्यात आला नाही. केवळ फोटो काढण्यात आले. त्याच्या गळ्यावर खुणा दिसत होत्या. शवविच्छेदन करताना ती हत्या असल्याचं जाणवत होतं. आपण ते वरिष्ठांना सांगितले पण घाई गडबडीत सगळं करण्यात आले. असाही दावा त्यांनी केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी येतो त्यावेळी आत्महत्या केलेला आणि हत्या केलेला मृतदेह यात भरपूर फरक दिसून येतो असे सांगून शहा म्हणाले की अंगावर मुकामार इतका होता की आत्महत्या करणाऱ्याच्या शरीरावर नसतात असाही दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

कर्नाटकातील कला संस्कृतीच्या जपणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

तुम्ही आधारकार्ड पॅनशी लिंक केले आहे का ?

अफगाणी महिलांना एनजीओमध्ये काम करण्यास मनाई; तालिबानी आदेश

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली होती. त्याचा मृत्यू सर्वानाच धक्का देणारा होता.या आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर सुशांच्या मृत्यू संदर्भात रोज नवे नवे अँगल समोर येत होते. सुशांतच्या कुटुंबियांनी देखील त्याची हत्या झाली असल्याचा आरोप सातत्याने केला होता. या प्रकरणाचा आता सीबीआय तपास करत आहे. पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या मृत्यूचे रहस्य कायम राहिले. पण आता शहा यांनी केलेल्या दाव्या नंतर सुशांत प्रकरणाच्या चौकशीला आणखी वेग मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा