…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय

…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय

फिलीपिन्समधून भारतात हद्दपार करण्यात आलेला गुंड सुरेश पुजारीच्या अटकेचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, पुजारी अटक टाळण्यासाठी फिलीपिन्समध्ये आश्रय घेण्याची तयारी करत होता.

गुंड सुरेश पुजारी (४५) हा फिलीपिन्समधून व्हीओआयपी वापरून मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील व्यावसायिकांना खंडणीचे कॉल करत असे. पुजारीला १४ डिसेंबर रोजी फिलीपिन्समधून नवी दिल्लीत आणण्यात आले. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नंतर या गुंडाला मुंबईत आणले आणि ठाण्यातील खंडणी प्रकरणात त्याला ताब्यात घेतले. महत्त्वाचे म्हणजे, इंटरपोलने त्याच्याविरुद्ध जारी केलेली रेड-कॉर्नर नोटीस (RCN) संपायच्या अवघ्या पाच दिवस आधी त्याला भारतात आणण्यात आले होते.

राज्याचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी हा ऑक्टोबरपर्यंत फिलीपिन्समधून खंडणी उकळण्यात सक्रिय होता. तो दुबईहून फिलीपिन्सला स्थलांतरित झाला कारण दुबईमध्ये व्हीओआयपी आणि व्हाट्सअँप कॉल करण्यात त्याला अडचणी येत होत्या.

एटीएसला असेही आढळून आले आहे की, खंडणीचा पैसा भारतातून यूएई आणि नंतर फिलिपिन्सला पाठवण्यात आला होता. सुरक्षा आस्थापनातील एका सूत्राने सांगितले की, दुबईच्या तुलनेत फिलीपिन्समध्ये व्हीओआयपी कॉल्स आणि व्हाट्सअँप निर्बंध फारसे कठोर नाहीत. शिवाय, तिथे सिमकार्ड मिळणेही अवघड नाही. त्याचे दुबई सोडण्याचे आणखी एक संभाव्य कारण म्हणजे त्याच्या जीवाला इतर टोळ्यांकडून दुबईमध्ये धोका होता. याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

… म्हणून अभिनेता विकी कौशल विरुद्ध तक्रार दाखल

सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

 

पुजारीच्या विरोधात आरसीएन जारी करण्यात आला होता. त्याआधारे त्याला फिलिपिन्सच्या सुरक्षा यंत्रणांनी १५ ऑक्टोबरला ताब्यात घेतले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ” आम्हाला अशीही माहिती मिळाली की, तो फिलीपिन्सची नागरीक असलेल्या महिलेशी लग्न करण्याचा आणि त्याच देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची योजना आखत होता. आणि या सर्व माहितीची आम्ही पडताळणी करत आहोत.

सुरेश पुजारी हा घाटकोपर येथील एका मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यावर ३१ गुन्हे आहेत. मात्र, फक्त १५ गुन्ह्यांची मुंबई पोलिसांकडे नोंद आहे. ज्यात खून, गोळीबार, धमकावणे आणि खंडणीचा समावेश आहे.

Exit mobile version