दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येसोबतच आता आरोपी आफताब पूनावालावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताबवर ड्रग्स सेवन केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजरेत ठेवण्यात येत आहे.
सोमवारी आफताबची पुन्हा रोहिणी येथील एफएसएलमध्ये पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. तत्पूर्वी, २५ नोव्हेंबर रोजी त्यांची शेवटची चाचणी घेण्यात आली होती. परंतु आफताबला ताप आल्यामुळे चाचणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. अशा स्थितीत पॉलीग्राफ चाचणीची उर्वरित प्रक्रिया सोमवारी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरत गुन्हे शाखेने २०नोव्हेंबर रोजी मुंबईतून ४ ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. यामध्ये फैसल मोमीन नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. मोमीन हा आफताबला ड्रग्ज पुरवायचा, असा पोलिसांना संशय आहे. फैसल मोमीन मुंबईतील वसई पश्चिम येथे राहत होता. आफताब श्रद्धासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी ज्या भागात भाड्याने घर घेत असे, त्याच परिसरात पोलिसांना संशय आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब हा मोमीनच्या घरी अनेकदा जात असे असे वसई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने
उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…
‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश
अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले
दिल्ली आणि मुंबई पोलिसांसोबतच आता गुजरात पोलिसही आफताबच्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. आफताब अमली पदार्थ विकणाऱ्याच्या संपर्कात कसा आला हे शोधण्यासाठी गुजरात पोलीस आता फैसल मोमीनच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे, आफताबच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजले की, आफताब ड्रग्जचे सेवनही करत असे.
आफताबची नार्को चाचणी होऊ शकते
बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सोमवारीही आफताबची नार्को चाचणी होऊ शकते. पॉलीग्राफ चाचणीच्या निष्कर्षांच्या आधारे आफताबला ७५ प्रश्न विचारले जातील. यामध्ये आफताबच्या पूर्व आणि हत्येनंतरच्या योजनेचे संपूर्ण सत्य काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.