मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी

कोव्हिड जम्बो घोटाळा प्रकरणाशी संबंधित चौकशी

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी

शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी कोव्हिड जम्बो घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे, या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने ३२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसले यांना इडिकडून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला

मणिपूरमध्ये म्यानमारच्या ७१८ जणांची घुसखोरी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!

दरम्यान, कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळाच्या वेगळा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या तपासात आर्थिक गुन्हे शाखेने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते. सोमवारी दुपारी १ वाजता सूरज चव्हाण हे मुंबई पोलीस मुख्यालयात असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सूरज चव्हाण यांची तब्बल पाच तास चौकशी केल्या नंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version