मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले 

मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशात खळबळ उडाली. संपूर्ण देशभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रया उमटत असताना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. तसेच या घटनेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने यावर टिपण्णी देताना म्हटले की, “जर या प्रकरणी सरकारने कठोर कारवाई केली नाही तर यावर आम्ही निर्णय घेऊ.” मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ हा अत्यंत त्रासदायक आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारला या घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा पद्धतीच्या घटनांमुळे संविधानाच्या अधिकारांची पायमल्ली आहे, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

या घटनेवर सर्वेच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश देत राज्य सरकारला अहवाल देखील सादर करण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पुढील आठवड्यात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, हिंसाचार सुरु असणाऱ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वापर एखाद्या वस्तूसारखा केला जात आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, ही माहिती देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. दरम्यान, हा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मणिपूरसह संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ आणि ही घटना ४ मे २०२३ रोजीची आहे. मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार

वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला संताप

ही घटना अत्यंत लज्जास्पद असून या घटनेमधील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेमुळे जगात भारताचं नाव खराब होत असल्याचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

Exit mobile version