28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामामाजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची सुटका नाहीच

माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची सुटका नाहीच

राज्य सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Google News Follow

Related

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला, सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने जी. एन. साईबाबा यांना निर्दोष ठरवलं होते. पण या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

२०१४ मध्ये जी एन साईबाबा यांना माओवाद्यांना मदत केल्याप्रकरणी आणि त्यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जी.एन. साईबाबा यांना आता तुरुंगातच राहावं लागणार आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा आणि इतरांची मुक्तता केली होती. तसेच त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती एमआर शहा आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेल्या साईबाबा यांना ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु, उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती न पाहता केवळ तांत्रिक कारणावरून निर्दोष मुक्तता केली, असे खंडपीठानं म्हटले आहे. योग्य प्रक्रियेचे पालन न करता यूएपीएचा खटला चालवण्याची परवानगी घेण्यात आली, असं उच्च न्यायालयाने म्हटलं होते. न्यायालयाने मात्र राज्य सरकारला दिलासा देत जी. एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

हे ही वाचा:

ट्रस यांनी असे काय केले की ब्रिटनमध्ये सरकार गडगडणार

‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

प्रकरणं काय आहे?

२०१३ साली जी.एन साईबाबा हे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. या दरम्यान, २०१३ मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोलीची कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या व्यक्तीच्या अटकेनंतर गडचिरोली पोलिसांना अधिक माहिती मिळाली. त्यानंतर याप्रकरणी गडचिरोलीतील काही जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असता हा तपास दिल्लीतील प्राध्यापक असलेल्या जी.एन साईबाबांपर्यंत पोहोचला.

पोलिसांनी अधिक तपास करत साईबाबा यांच्या घराची झडती घेतली. पोलिसांना अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे साईबाबा यांच्या घरातून सापडले. पुराव्यांच्या आधारे जीएन साईबाबा यांच्यावर जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागांतील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचं काम करत असल्याचा आणि देशाच्या विरोधात लढा पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला. साईबाबा हे शारिरीकरित्या ९० टक्के दिव्यांग आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा