पत्नीची हत्या करून पती स्टोअर रूममध्ये बसला होता लपून !

घरगुती वादातून झाला गुन्हा

पत्नीची हत्या करून पती स्टोअर रूममध्ये बसला होता लपून !

भारतीय महसूल सेवेच्या एका माजी अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घडली.आरोपीने पत्नीची हत्या करून स्वतःच्या बंगल्यातील स्टोअर रूममध्ये लपून बसला होता.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृत वकील महिला रेणू सिन्हा (६१) यांच्या भावाने दोन दिवस वारंवार फोन केला मात्र, तीने प्रतिसाद दिला नसल्याने भावाने चिंता व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.पोलिसांनी घराचे कुलूप तोडून तेव्हा रेणूचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.आरोपी पतीचा फोन बंद लागत असल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता.दोन्ही दाम्पत्यांमध्ये वारंवार वाद असल्याचे मृत महिलेच्या भावाने पोलिसांना सांगितले.

हे ही वाचा:

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना

ठाण्यात ४०व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ६ कामगार ठार

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो बंगल्यातील स्टोअर रूममध्ये सापडला.अजय नाथ (६२) असं आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा करून स्वतःच्या बंगल्यातल्या टेरेसवर रिकाम्या स्टोअर रूममध्ये लपून बसला होता.पोलिसांनी त्याला अटक केली व चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.स्वतःचा बंगला ४ कोटी रुपयांना विकण्यास काढला होता, त्यासाठी आगाऊ रक्कमही घेतली होती मात्र त्याची पत्नी बंगला विक्रीच्या विरोधात असल्याने तिची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेला कर्करोग झाला होता, परंतु एक महिन्यापूर्वी त्या आजारातून बऱ्या झाल्या होत्या.प्राथमिक तपासात रेणूचा मृत्यू जास्त रक्तस्रावामुळे झाला असावा असे निष्पन्न झाले. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Exit mobile version