वरळीतील फोर सीजन रेसिडेन्सी दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कंत्राटदार, सुरवायझर यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
वरळीत एल आर पापन मार्ग या ठिकाणी असलेल्या फोर सीजन रेसिडेन्सी या ४२ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या ४२व्या मजल्यावर असलेल्या बांधकाम क्रेनला असलेले सिमेंटचे ब्लॉक निखळून चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या साबिरली साकीर अली (३७) आणि इम्रान अली खान (२९) यांच्या अंगावर पडून दोघे गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला होता.
हे ही वाचा:
बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा
आग्रा किल्ल्यात साजरी होणार यंदाची शिवजयंती
एअर इंडियाचा ऐतिहासिक करार ,अमेरिकेकडून २२० बोईंग विमाने खरेदी
श्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली
या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते. याप्रकरणी वरळी पोलिसांनी बुधवारी दुर्घटनेत मृत पावलेल्या साबीर अली याचा भाऊ मिर्झा यांची फिर्याद नोंदवून फोरसिझन रेसीडेन्सी या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे बांधकाम कॉन्टॅरक्टर, सुपरव्हायझर व इतर संबंधितनविरुद्ध गुन्हा भा.द.वी कलम ३०४अ,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार आणि संबंधित सुरवायझर असे एकूण तीन जणांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.