सुपरटेकचे चेअरमन आर. के. अरोरा यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सुपरटेक रिअल इस्टेट कंपनीचे अध्यक्ष आर. के. अरोरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने आर. के. अरोरा यांना मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ईडीने अरोरा यांच्या २५ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत ४०.३९ कोटी रुपये आहे. या मालमत्ता सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांच्या संचालकांच्या होत्या. या मालमत्ता उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये होत्या. ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
सुपरटेक कंपनी आणि तिच्या संचालकांनी संभाव्य खरेदीदारांकडून बुक केलेल्या फ्लॅटसाठी आगाऊ रक्कम गोळा करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संचालक या लोकांना वेळेत फ्लॅटचा ताबा देण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच कंपनीने जनतेच्या पैशाची फसवणूक केली आहे. सुपरटेक लिमिटेड आणि ग्रुप कंपन्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले आणि बँका आणि वित्तीय संस्थांकडून विशिष्ट मुदतीचे कर्ज घेतले असे तपासात आढळून आले आहे. मात्र, या निधीचा दुरुपयोग करून इतर समूह कंपन्यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
हे ही वाचा:
रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण
समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ
तीन चौकशीच्या फेऱ्याअंती अरोरा यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर नोएडा येथील ट्विन टॉवर पाडण्यात आले होते. साधारण तीन हजार किलोग्राम विस्फोटकांचा वापर करुन या इमारती पाडण्यात आल्या होत्या.