मी मास्टरमाईंड नाही, समीर वानखेडेंशीही संपर्क नाही, असे विधान करत कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामुळे चर्चेत आलेला सुनील पाटील अखेर प्रसारमाध्यमांच्या समोर आला.
आता सुनील पाटीलच्या विविध माध्यमांनी मुलाखती घेतल्या आणि त्यात त्याने त्याची नेमकी यातली भूमिका काय हे सांगितले. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आपण या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही तसेच समीर वानखेडे यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण सुनील पाटीलने एएनआयशी बोलताना दिले.
आर्यन खान अटकेचे प्रकरण हळूहळू उलगडू लागल्यावर त्यातील प्रत्येक पंचाच्या तोंडी सुनील पाटीलचे नाव होते. मात्र तो कोण हे स्पष्ट होत नव्हते. अखेर त्याने आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. आपण ही माहिती विशेष तपास पथकाला तसेच एनसीबीला देणार असल्याचेही तो म्हणाला.
एएनआयशी बोलताना तो म्हणाला की, ‘गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हते. त्यामुळे काही महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच’, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.
हे ही वाचा:
ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?
पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या
ICC T20 WC: अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांची प्रार्थना
महाराष्ट्रातले प्रश्न संपले; धनंजय मुंडेंच्या दिवाळी कार्यक्रमात नाचली सपना चौधरी