ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बडतर्फ पोलीस सुनील माने यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार पेरून ठेवल्याच्या घटनेत आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा करत माने यांनी जामीन अर्ज दाखल केला होता आणि पुढे, हिरेनच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग दर्शविणारा कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही नसल्याचे त्याने अर्जात म्हटले होते.
हे ही वाचा:
अदानी समूहाविरोधात उद्या ठाकरे गटाचा धारावीत मोर्चा!
मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पंड्याच्या हाती!
एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?
ठाण्यातील व्यापारी हिरेन यांच्या हत्येप्रकरणी माने यांना एनआयएने २३ एप्रिल रोजी अटक केली होती. हिरेनच्या हत्येसाठी वाझे यांनी रचलेल्या कटाचा तो एक भाग असल्याचा दावा केला जात आहे आणि हत्येचा कट रचण्यासाठी वाझे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची भेट झाली तेव्हाही तो उपस्थित होता.
बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने हे तुरुंगात असून त्यांनी जामीनासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावत जामीन नाकारला आहे.