सुनील मानेला वाटते आहे तुरुंगाची भीती

सुनील मानेला वाटते आहे तुरुंगाची भीती

गुन्हेगारांना पकडून तुरुंगात टाकणाऱ्याना आता तुरुंगाची भीती वाटू लागली आहे. सचिन वाझे पाठोपाठ तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आलेल्या पोलीस इन्स्पेक्टर सुनील माने याच्या वकिलांनी माने यांच्या सुरक्षेची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने देखील माने याच्या सुरक्षेबाबत तोंडी आदेश दिले आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई गुन्हे शाखेचे निलंबीत पोलीस इन्स्पेक्टर सुनील माने याला शनिवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनील माने याला १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने डाळ सडवली

भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा

चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी

स्पुतनिक-वी भारतात दाखल

दरम्यान सुनील माने यांना ठेवण्यात येणाऱ्या तळोजा तुरुंगात सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी माने यांचे वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने लेखी आदेश न देता माने याच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल असे तोंडी आदेश दिले आहे.

नवी मुंबईतील तळोजा येथे असणाऱ्या तुरुंगात गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच कुख्यात गुंड शिक्षा भोगत आहे. त्याच बरोबर सचिन वाझेला देखील सुरक्षेच्या कारणावरून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतर तुरुंगापेक्षा तळोजा तुरुंग अनेक पटीने सुरक्षित असल्याचे तुरुंग अधिकारी यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version