प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी

प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी

न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याचा एनआयएला ताबा मिळाला असून प्रदीप शर्मा आणि इतर ४ आरोपींना समोर ठेवून सुनील मानेकडे चौकशी करण्यात येणार आहे.
११ जून रोजी अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांची एनआयए कोठडी संपली होती. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयातून ताबा घेण्यात आलेल्या सुनील माने आणि संतोष शेलार, आनंद जाधव या या तिघांना २५ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. प्रदीप शर्मा यांनी रोज वकिलाला भेटण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती त्यानुसार त्यांना १२ ते १२:२० या काळात वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोज त्यांना २० मिनिटे भेटता येणार आहे.

हे ही वाचा:
राममंदिरचे सरचिटणीस चंपत राय यांच्याविरोधातील पोस्टसंदर्भात तिघांवर गुन्हा

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार

योग दिनानिमित्त एम. योगा अ‍ॅपची भारतीयांना भेट

शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा झाली भेट

संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी शर्मा आणि वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुखची हत्या केली. मनसुखचा एकाने डावा हात पकडला होता तर एकाने उजवा हात पकडून ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे. आम्हाला दोघांची अजून १० दिवसांची कोठडी हवी आहे, असे एनआयएने म्हटले आहे.

या प्रकरणातले आणखी काही आरोपी फरार आहेत त्याची माहिती या आरोपीकडून मिळू शकते म्हणून आम्हाला कोठडी हवी आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली. संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांनाही २५ जूनपर्यंत एनआयए कोठडी. सुनील माने,संतोष शेलार आणि आनंद जाधव तीनही आरोपींना आता २५ जूनपर्यंत पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version