सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार

हल्ल्यातून बादल थोडक्यात बचावले

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार

माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे अगदी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या गोळीबाराच्या घटनेनंतर उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी बादल आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली. या शिक्षेचा एक भाग म्हणून, बादल आणि २०१५ पासून राज्यातील मंत्र्यांसह अकाली दलाच्या ‘कोअर कमिटी’ सदस्यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगरमध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे आणि सुखमनी साहिबचे पठण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ला ऍडव्हान्स बुकिंगमधून मिळाले १०० कोटी

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

भारत- चीन करारानंतर सीमेवर ‘सब शांती शांती है!’

सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर गळ्यात फलक आणि हातात भाला घेऊन बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला आणि त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे. नारायण सिंह असे त्याचे नाव असून त्याने सुखबीर बादल यांच्यासमोर जाऊन बंदूक बाहेर काढली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले त्याला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने पळाले. रोखल्यामुळे नारायण सिंहने हवेत गोळीबार केला.

Exit mobile version