लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला

जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे अटकेत असलेले निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला आहे.

करोना काळात दोन जम्बो कोविड केंद्रातील कामात अनियमितता केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार देत जामीन अर्ज फेटाळला आहे.

आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मानवी जीवन वाचविण्यासाठी पुढे आल्याचे दाखवले असले तरीही त्यांनी गुन्हेगारी कट रचला होता. डॉक्टरांशी हातमिळवणी करून खोटे कर्मचारी दाखवून पालिकेला लुबाडण्याच्या उद्देशाने त्यांनी योजना आखली आणि लोकांच्या जीवाशी खेळले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळयाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना जुलै २०२३ मध्ये अटक केली होती. करोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आले होते. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत हा मुद्दा उचलून धरला होता.

काय आहे प्रकरण?

करोना काळात लाईफलाईन कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केला होता. हा १०० कोटींचा घोटाळा होता. ही कंपनी सुजीत पाटकर यांची होती. वाढीव दरात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कामाचा अनुभव नसतानाही लाईफलाइन कंपनीला टेंडर देण्यात आले होते. पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नाहीत, असं ईडी चौकशीतून समोर आले.

हे ही वाचा:

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!

खासदार संजय राऊत हे भागीदार असलेली लाईफलाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल १०० कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

Exit mobile version