कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक

न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक

मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचा गुरुवारी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ताबा घेऊन अटक करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस साठी करार केल्या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली असून गुरुवारी पाटकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

नो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !

कोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा !

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर राहुल गांधी

सुजित पाटकर यांना ईडीने गेल्या महिन्यात मनी लान्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात पाटकर हे न्यायालयीन कोठडी असतांना आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात पाटकरचा ताबा न्यायालया कडून घेऊन गुरुवारीअटक करण्यात आली. तत्पूर्वी ही अटक टाळण्यासाठी पाटकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.  

पाटकर यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस साठी करार केला होता. पाटकर हे लाईफ लाईन हॉस्पिटलच्या भागीदारापैकी एक होते, व त्यांनी कोरोना काळात कोरोना उपचार केंद्रासाठी कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोव्हिडं सेंटर या ठिकाणी दाखविण्यात आलेले कर्मचारी देखील बोगस होते.  

महानगर पालिकेकडून कंत्राट मिळवण्यासाठी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस’ने खोटी कागदपत्रे सादर केली आणि मुंबई महानगर पालिकेची ३६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती,निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांनंतर, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपाया आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीकडून तपास करून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर आणि अन्य आरोपींना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती.

Exit mobile version