मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात अजूनही धगधगत असून यासाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही विद्यार्थिनी ९ वी इयत्तेत शिकत होती. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर गावामधील इयत्ता ९ मध्ये शिकणाऱ्या कोमल हिने स्वतःच्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझे बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई- अण्णा मला माफ करा,” असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहेत. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा:
नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?
अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी
मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई
वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे
यापूर्वीही मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील चार तरुणांनी आत्म्हत्येसारखे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण सहा टप्प्यात हा दौरा असणार आहे. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.