राजस्थानमधील कोटामध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे. रविवारी रात्री आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पुष्पेंद्र असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो जालौर येथे राहणारा होता. तो कोटामध्ये राहून वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट यूजीची तयारी करत होता. विद्यार्थ्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून त्याच्या आप्तांना याबाबत कळवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पेंद्र एक आठवड्यापूर्वीच जालौर येथून कोटा येथे अभ्यास करण्यासाठी आला होता. हा विद्यार्थी जवाहर नगर परिसरातील राजीव गांधी नगरमधील एका हॉस्टेलमध्ये राहात होता. तो त्याच्या चुलतभावासोबत राहात होता. त्याचा चुलतभाऊ बाजारात गेला होता. तो १५ मिनिटांनंतर परतला असता पुष्पेंद्रने दरवाजा उघडला नाही. याबाबतची माहिती त्याने हॉस्टेलच्या संचालकांना दिली. खिडकीची काच तोडल्यानंतर त्यांना पुष्पेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थते दिसला.
हे ही वाचा:
सीमा हैदरचा बदला म्हणून पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू मंदिरावर रॉकेटहल्ला
पाकिस्तानी सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात?
गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याने केले कुत्र्याला ठार; कलाकार, कर्मचाऱ्यांत भीती
सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ
आपले भविष्य घडविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी कोटामध्ये येतात. सन २०२३मध्ये आतापर्यंत एकूण २३ जणांनी आत्महत्या केली आहे. हे विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी कोटा येथे आले होते. ही सर्व मुले १५ ते १८ वयोगटातील होती.
कोटामध्ये प्रत्येक महिन्यात अभ्यासाचा ताण किंवा अन्य कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. या विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यासाठी बैठकांवर बैठका घेऊन आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करूनही हे आत्महत्यासत्र थांबलेले नाही.
नुकतीच एका विद्यार्थ्याने कोचिंग क्लासच्या संचालकांनी धमकावल्याने मानसिक ताणातून आत्महत्या केली होती. विद्यार्थ्याच्या भावाने कोचिंग क्लासच्या विरोधात महावीर नगर पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती.