मिरारोड परिसरातून मोठा तस्कर जाळ्यात!

मिरारोड परिसरातून मोठा तस्कर जाळ्यात!

अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई शाखेने बुधवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून अटक केली. देशाच्या विविध ठिकाणी हा विमान प्रवासात साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्सची तस्करी करायचा. बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडचे अमली पदार्थ कनेक्शन समोर आले. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली. तेव्हापासून एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणातील कारवाया सुरू आहेत.

याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजेरियन तरुणालाही एनसीबीनेने अटक केली आहे. या नायजेरियन तस्कराला पकडण्यासाठी एनसीबीने रिक्षा चालकाचे वेशांतर केले होते. या नायजेरियन तस्कराकडून एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज जप्त केले आहे.

हे ही वाचा:

आईची हत्या करून हृदय खाल्ले

काश्मिरमध्ये २४ तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

सुफियान हा भारतातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींना ड्रग्ज पोहचवत असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यात काही बॉलिवूडमधील कलाकारांनाही समावेश आहे. सुफीयानने या तस्करीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले होते. सध्या तो मिरारोडच्या उच्चभ्रूवस्तीत रहायला होता. या दोघांना एनसीबीच्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात एनसीबीने ठाण्याच्या तुरुंगात असलेल्या इक्बाल कासकरला ताब्यात घेतले होते. जम्मू-काश्मीरमधून आलेले हशीश त्याच्याकडे सापडले होते. खंडणीप्रकरणी सध्या तो तुरुंगात आहे.

Exit mobile version