मुलाचा मृतदेह बॅगेत कोंबून नेत असताना सुचाना सेठ ही महिला गोव्यातील चोलार घाट येथे वाहतूककोंडीत अडकली होती. त्यामुळे तिचा पुढे बेंगळुरूचा प्रवास रखडला आणि पोलिस तिला सहजच पकडू शकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माइंडफुल एआय लॅब या स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी सुचाना सेठ ही मुलाची हत्या केल्यानंतर बेंगळुरूमध्ये पळण्याच्या प्रयत्नात होती. मात्र गोव्याच्या चोरला घाट येथे अपघात झाल्यामुळे तेथे चार तास वाहतूककोंडी होती. या वाहतूक कोंडीत सुचाना अडकल्यामुळे तिचा बेंगळुरूला जाण्याचा प्रवास रखडला आणि तिने तिच्या मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुलाचा मृतदेह बॅगेत भरून नेत असताना कर्नाटकच्या चित्रादुर्ग पोलिसांनी सोमवारी रात्री तिला अटक केली. गोव्यातील न्यायालयाने मंगळवारी सुचाना सेठ हिला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
भारतीत पुरातत्त्व विभागाचे मोहम्मद म्हणतात, राममंदिर अनेक पटीने विशाल होते!
लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!
जय श्रीराम : सोहळ्यातील ११ हजार व्हीआयपींना देणार स्मृतिचिन्ह!
सुचाना हिने ८ जानेवारी रोजी उत्तर गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमधून निघाली होती. तिथे ती ६ जानेवारीपासून तिच्या मुलासोबत राहात होती. तिने सर्व्हिस अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना तिच्यासाठी बेंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बघण्यास सांगितले. विमानाचे तिकीट स्वस्तात पडेल, असे सांगूनही तिने टॅक्सीचाच आग्रह धरला. तिच्या पतीला त्यांच्या मुलाची भेट घेण्यापासून रोखण्यासाठी सुचाना हिने तिच्या मुलाची हत्या घडवून आणल्याचा संशय आहे.
सुचाना आणि तिचे पती वेंकट रमण यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. वेंकट रमण याने इंडोनेशियातून ७ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाशी व्हिडीओ कॉलमार्फत बोलणे केले होते. ६ जानेवारी रोजी रात्री तिने रमण यांना तो त्यांच्या मुलाला भेटू शकतो, असा मेसेज केला होता. रमण मंगळवारी संध्याकाळीच इंडोनेशियातून भारतात परतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचीही पोलिस चौकशी केली जाईल.