जम्मू काश्मीरमधील बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.
बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या कारवाई दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आबिद वानी असे असून तो कुलगामचा रहिवासी होता. त्याच्याकडून एक
एके- ४७ रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
#UPDATE मारे गए आतंकवादी की पहचान यारहोल बाबापोरा कुलगाम निवासी आबिद वानी के रूप में हुई है, जो प्रतिबंधित आतंकवादी संगठन लश्कर से जुड़ा हुआ है। आपत्तिजनक सामग्री और एक AK-47 राइफल बरामद हुई है: कश्मीर जोन पुलिस
— ANI_HindiNews (@AHindinews) May 6, 2023
दुसरीकडे राजौरीच्या कांडी जंगलात चकमक सुरू असून घनदाट जंगलात सर्च ऑपरेशन सुरू आहे. ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने राजोरी येथे पाच जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे ही वाचा:
इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती
भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे लोक राष्ट्रवादीत असू शकतात, जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?
दाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!
दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले
जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील कांडी भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून काहीजण जखमी झाले. राजौरी जिल्ह्यातील थन्नामंडी आणि दारहाल तालुक्यातील घनदाट जंगलात चार ते सहा दहशतवादी सक्रियपणे फिरत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पथके संशयित ठिकाणी पोहोचताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, प्रत्युत्तर देत चकमक सुरू झाली आणि दुर्दैवाने यात जवान शहीद झाले.