दोन वर्ष कोरोना काळात घरात डांबून राहिलेल्या विद्यार्थ्यांवर घरात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नव्हता. आता कोरोना काळ लोटल्यानंतर शाळा-महाविद्यालय पुन्हा नव्याने सुरु झाले आहेत. मात्र या शाळा-महाविद्यालयांची शैक्षणिक पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व पालक वर्ग ऑनलाईन माध्यमात पुस्तक शोधतात. हीच बाब लक्षात घेऊन सायबर गुन्हेगार त्या विद्यार्थी व पालकांना हेरून पुस्तके विकत घेणाऱ्यांना लक्ष्य करतात व आर्थिक फसवणूक करतात, असे उघड झाले आहे.
अनेक पुस्तकालयात पुस्तके उपलब्ध नसल्याने पालक व विद्यार्थी पुस्तके शोधण्यासाठी ऑनलाईन मार्गांचा पर्याय स्वीकारतात. त्याचाच हे सायबर गुन्हेगार फायदा घेतात. राज्यातील जवळपास २ हजार ६०० पेक्षा जास्त जणांची ऑनलाईन माध्यमातून पुस्तकं विकत घेणाऱ्यांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
प्रवाशांच्या सेवेत येणार ‘बेस्ट’ वातानुकूलित डबल डेकर
लालबागच्या राजाला युट्यूबकडून ‘चांदीचा मान’
अशी होते फसवणूक
ऑनलाईन पुस्तक खरेदी करताना, पुस्तक उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी टाकली जाते. तीच पुस्तक बनावट लिंक द्वारे संकेतस्थळावर उपलब्ध असतात. या पुस्तकांवर १० टक्के सूट देऊन उर्वरित रक्कम ‘स्कॅन’द्वारे भरण्यास सांगितली जाते. डिलीटल पेमेंटमधून स्कॅन केले असता, खात्यातली मोठी रक्कम गुन्हेगार काढून घेतात. सायबर गुन्हेगारात उच्च शिक्षित लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. हे गुन्हेगार स्वतःचा नंबर संकेतस्थळावर देतात. ग्राहकांनी संपर्क केला असता, लगेच पैसे पाठवण्यासाठी लिंक किंवा क्यूआर कोड पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात. अनोळखी किंवा संशयित वाटणाऱ्या लिंकला क्लीक करू नका. अज्ञात ठिकाणावरून येणारा क्यूआर कोड पाठविल्यावर तो स्कॅन करू नका. फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करा, अशी सूचना सायबर क्राईम पोलीस अधिकारी सुकेशिनी लोखंडे यांनी दिली आहे.