जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

गोंधळलेल्या शिक्षकाने केली मारहाण

जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

सोमवार, २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सगळीकडे उत्साह संचारला आहे. विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जय श्रीराम, सीताराम आणि रामनामाचा जयघोष केला जात आहे. अशाच उत्साहाच्या भरात एका विद्यार्थ्याने शाळेत ‘जय श्री रामा’चा जयघोष केला. मात्र वर्ग सुरू असताना अशाप्रकारे धार्मिक घोषणाबाजी केल्यामुळे शिक्षक अब्दुल वाहिद संतापले. सुरुवातीला ते त्याला खूप ओरडले, त्यानंतर त्यांनी त्याला खूप मारहाण केली. नंतर मात्र या शिक्षकांना अटक करण्यात आली.

शाळेत मार बसल्याने पीडित मुलाच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन शाळेच्या शिक्षिका आणि शाळेच्या संचालकांविरोधात दंगलीसाठी उकसवणे, जाणुनबुजून दुखापत करणे आणि किशोर न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शाळेत जाऊन दोघांना अटक करण्यात आली.

ही घटना शहडोल जिल्हा मुख्यालयापासून २२ किमी दूर असलेल्या ग्रीन बेल्स शाळेत घडली. येथे १२ वर्षीय एक विद्यार्थी सातवीमध्ये शिकतो. त्यांच्या वर्गात इंग्रजीचा तास सुरू होता. त्यावेळी तिथे शिक्षक अब्दुल वाहिद उपस्थित होते. या दरम्यान विद्यार्थ्याने जय श्रीराम, जय श्रीराम अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!

पंतप्रधानांकडून मुनई मंदिरात केली प्रार्थना!

लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!

सुशांतसिंह राजपूत आज ३८ वर्षांचा असता;बहिणीने नव्या पुस्तकातून जागवल्या आठवणी!

हा जयघोष सुरू असताना अब्दुल यांना राग आला. त्याने काठीने विद्यार्थ्याला जोरदार मारहाण केली. त्यात या मुलाला खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर पीडित मुलाच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही हिंदू संघटनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. शाळा व्यवस्थापनावर हलगर्जी केल्याच्या आरोपाखाली पोलिस कारवाई सुरू आहे.

Exit mobile version