दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

दिल्ली विद्यापीठाच्या आर्यभट्ट कॉलेज परिसरातील घटना

दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

दिल्ली विद्यापीठाच्या आर्यभट्ट कॉलेज परिसराच्या बाहेर रविवारी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. निखिल चौहान असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विद्यापीठाच्या ओपन लर्निंग स्कूलमध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या वर्गात जाण्यासाठी तो कॉलेजमध्ये आला होता.

सात दिवसांपूर्वी निखिलचा एका व्यक्तीशी वाद झाला होता. त्यानेच निखिलवर चाकूने वार केले. विद्यार्थ्याने निखिलच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. रविवारी आरोपी विद्यार्थी त्याच्या तीन साथीदारांसह आला आणि कॉलेजच्या गेटबाहेर निखिलला धक्काबुक्की केली. निखिलला मोतीबाग येथील चरक पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

निखिल हा राज्यशास्त्र विषयातील बीए ऑनर्सच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता आणि तो पश्चिम विहारचा रहिवासी होता. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. पोलिस गुन्ह्याच्या ठिकाणी आणि आसपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करतील. संशयितांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

निखिलचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. ‘एक मौल्यवान जीव गमावल्यामुळे आम्ही खरोखर दुःखी आहोत. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि या दुःखाच्या वेळी निखिल चौहानच्या कुटुंबीयांना शक्ती देवो,’ असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण पश्चिम दिल्लीत एका दिवसात तीन हत्या

निखिलच्या हत्येसोबत दक्षिण पश्चिम दिल्ली जिल्ह्यात २४ तासांपेक्षा कमी कालावधीत एकूण तीन हत्या झाल्या आहेत. दिल्लीच्या आरके पुरम भागात दोन बहिणींची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर काही तासांनी निखिलची हत्या झाली. रविवारी पहाटे आरके पुरममध्ये दोन महिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यामागील हेतू हा आर्थिक वादाशी संबंधित असल्याचे दिसते. हल्लेखोरांनी प्रामुख्याने पीडितेच्या भावाला लक्ष्य केले होते, परंतु वादाच्या वेळी चुकून महिलांवर गोळी झाडली गेली, असे पोलिसांनी प्राथमिक तपासात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देऊन ट्वीट केले आहे. ‘उपराज्यपाल सर, तुम्ही काय करत आहात? माझ्या दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सर, तुम्ही आमच्या दिल्लीचे काय केले?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नवी दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्था, जमीन आणि पोलिसांवर उपराज्यपालांचे नियंत्रण असते.

Exit mobile version