दरभंगामध्ये मंदिरातून परतणाऱ्या भाविकांवर दगडफेक

परिस्थिती नियंत्रणात; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

दरभंगामध्ये मंदिरातून परतणाऱ्या भाविकांवर दगडफेक

चैत्र नवरात्रीला रविवार (३० मार्च) पासून सुरुवात झाली असून यानिमित्त देशभरातील देवींच्या मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अशातच बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात मंदिरातून परतणाऱ्या काही भाविकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. मुस्लिम समुदायाच्या लोकांनी माँ दुर्गा मंदिरातून परतणाऱ्या भाविकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत महिलांचाही सहभाग होता, अशी माहिती आहे. ‘झी न्यूज’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान पोलिस ठाणे परिसरातील केवतगामा पंचायतीच्या पछियारी गावात दुर्गा मंदिरात कलश स्थापित करून परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर काही लोकांनी दगडफेक केली. यामुळे कलश शोभा यात्रेत चालणाऱ्या लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला भाविक इकडे तिकडे धावू लागल्याने गोंधळ उडाला आणि काही महिला पळताना पडल्या. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, मोहम्मद अलाउद्दीन याच्या घराच्या छतावरून भाविकांवर दगडफेक करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा एसपींनी सांगितले आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरभंगाचे एसएसपी जगुनाथ रेड्डी जलारेड्डी म्हणाले की, कलश स्थापित करून परतणाऱ्या भाविकांवर काही दगडफेक करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत केले. सध्या परिस्थिती शांत आहे. तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल: मोथाबाडीत तणाव कायम

मां मुंडेश्वरी धाममध्ये माता मुंडेश्वरीचा खास श्रंगार

‘मन की बात’: पंतप्रधान मोदी म्हणाले, जलसंवर्धन महत्त्वाचे!

धीम्या ओव्हर गतीसाठी हार्दिक पांड्याला दंड

होळीच्या निमित्तानेही याआधी दोन समुदायांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे. पंचायतीचे माजी प्रमुख आलोक कुमार उर्फ विकास कुमार यांनी सांगितले की, होळीच्या दिवशी काही लोकांनी होळी खेळणाऱ्या तरुणाला जखमी केले होते. नंतर चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यात आला. पण रविवारी नवरात्र कलश शोभा यात्रेवरून परतणाऱ्या गर्दीवर दगडफेक झाल्याने गावात पुन्हा तणाव पसरला आहे.

ही अवघ्या संघ स्वयंसेवकांची काशी मथुरा! | Mahesh Vichare | Prof. Thomre | Dr Hedgewar |

Exit mobile version