सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून मोठ्या जल्लोषात लोकांकडून हा सण साजरा केला जात आहे. अशातच कर्नाटकमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवार, ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून जात असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पुढे वाद वाढला आणि जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या. काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड करून वाहनेही पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या या परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत असून पोलिसांनी कलम १४४ लागू केलं आहे.
मंड्याचे उपायुक्त डॉ. कुमार यांनी सांगितले की, “गणेशाच्या मिरवणुकीदरम्यान संध्याकाळी ही घटना घडली. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली तेव्हा काही लोकांनी दगडफेक केली. याला विरोधही झाला. आयजी, एसपी आणि मी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. १४ सप्टेंबर पर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”
Karnataka | Prohibitory orders imposed in Mandya district's Nagamangala after a group of miscreants set shops on fire, and two police staff were injured. I have no information related to the machete or other weapons used in the clash. Investigation is underway. We are verifying…
— ANI (@ANI) September 12, 2024
हे ही वाचा :
फरार उद्योगपती नीरव मोदीची २९ कोटींची मालमत्ता जप्त !
राहुल गांधींच्या शीखांवरील वक्तव्याविरोधात दिल्लीत आंदोलन !
बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!
गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !
गुजरातमधील सुरत येथेही अशीच एक घटना घडली होती. या घटनेनंतर सुरतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणात २७ जणांना अटक करण्यात आली आहे. या दगडफेकीत आणि गोंधळामध्ये अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.