पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक

खिडकीची काच तुटली, पण कुणालाही इजा नाही

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केरळमधील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. मात्र ही रेल्वे मलप्पूरम जिल्ह्यातील थिरुनावाया आणि तिरुर स्थानकांदरम्यान धावत असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही. मल्लपूरम पोलिसांनी या प्रकरणी परिसरात तपास सुरू केला आहे. तर, रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेच्या सी४ डब्यातील ६२ आणि ६३ या सीटच्या खिडकीवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे या खिडकीची काच तुटली. दक्षिण रेल्वे परिक्षेत्राचे अधिकारी एकूणच परिस्थितीची पाहणी करत आहेत. तसेच, पुढील १५ दिवसांसाठी या रेल्वेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ एप्रिल रोजी थिरुवनंतपूरम स्थानकावरून केरळमधील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. या रेल्वेला मलप्पूरम जिल्ह्यातील तिरुर स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने आंदोलनही केले होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या राजकारणात हडकंप, शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार

समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन

‘केरळ स्टोरी’तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट

केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून रेल्वेच्या खिडकीला तडा गेल्याच्या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीचा तीव्र निषेध. ही घटना अतिशय दुर्दैवी असून समस्त केरळसाठी लाजिरवाणी बाब आहे. पहिल्याच दिवसापासून या रेल्वेला काही घटकाकडून विरोध होत होता. पोलिसांनी यातील गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘वंदे भारत’ रेल्वेची जेव्हा घोषणा झाली, तेव्हा या रेल्वेला थांबा मिळणाऱ्या स्थानकांच्या यादीत तिरुरचाही समावेश होता. मात्र त्यानंतर शोरनर या स्थानकाचा समावेश करण्यात आल्यानंतर तिरुर स्थानकाला वगळण्यात आले.

Exit mobile version