उत्तर प्रदेशातील बरेली येथे कावड यात्रेवर झालेल्या दगडफेकीत सुमारे डझनभर भाविक आणि काही पोलिस जखमी झाल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशातील बरेली येथे कावड यात्रेदरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. सुमारे दोन हजार भाविकांचा समावेश असलेली कावड यात्रा पाणी भरण्यासाठी जात असताना, जोगी नवाडा भागातील शाहनूरी मशिदीजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेत सुमारे डझनभर कावडिया आणि काही पोलिस जखमी झाले.
कछला घाटातून पाणी घेण्यासाठी कावडिया जात असताना शाहनूरी मशिद आणि जवळपासच्या घरांवरून धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, अशी माहिती बरेलीचे पोलिस अधीक्षक राहुल भाटी यांनी दिली. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी म्हणाले, “आज या परिसरातून कावड यात्रा निघत होती. ही यात्रा एका धार्मिक स्थळाजवळून जाताच काहीतरी फेकण्यावरून वाद झाला, त्यातून दगडफेक झाली. मिळालेल्या फुटेजमध्ये दोन्ही बाजू एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत.”
हे ही वाचा:
मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली
सात्विक-चिरागला वर्षातील तिसरे विजेतेपद !
न्यायाधीशांचा कुत्रा हरवला; सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित करा!
मुंबईत तस्करी करून आणलेली ३० कोटींची घड्याळे जप्त
पोलिस दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कावड यात्रा आपल्या मार्गाने पुढे निघाली. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.