30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामासूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक

सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक

सुरत येथील सय्यदपुरा भागातील घटना

Google News Follow

Related

राज्यासह देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाने मोठा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. अशातच गुजरातमधील सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. सुरत येथील सय्यदपुरा भागात गणपती मंडळावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात सोमवार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे काही अल्पवयीन मुलांनी गणेश मंडपावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला आहे. सय्यदपुरा भागात ही घटना घडली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत यांनी सांगितले की, “काही मुलांनी गणेश मंडपावर दगडफेक केली आणि त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब तेथून दूर नेले. पोलिसांना घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आले. ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी लाठीमार करण्यात आला आणि अश्रुधुराचा वापरही करण्यात आला. शांतता भंग करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत.”

हे ही वाचा:

हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?

‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक

ममता सरकारवर नाराज खासदाराने दिला राजीनामा

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !

पहाटे २.३० च्या सुमारास गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि स्थानिक भाजपा आमदार कांती बलर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांनी यावेळी परिसरातील तणाव कमी करण्यासाठी स्थानिकांशी चर्चाही केली. हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मंडपावर दगडफेक करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय, दगडफेकीला प्रोत्साहन देणाऱ्या २७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ते पुढे असेही म्हणाले की, अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सूरतच्या सर्व भागात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास हर्ष सांघवी यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा