गोव्यातून आलेला बनावट मद्याचा साठा जप्त !

तीन जणांना अटक

गोव्यातून आलेला बनावट मद्याचा साठा जप्त !

गोवा राज्यातून बेकादेशीररित्या महाराष्ट्रराज्यात विक्रीस आणल्या जाणाऱ्या बनावट मद्याचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.ठाणे जिल्यातील तुर्भे रेल्वेस्थानकासमोरील रोडवरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच कोकण विभागीय राज्यउत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कारवाई करत ७४ लाख आठहजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र राज्यात अवैध दारू विक्रीस बंदी आहे.मात्र, गोवा राज्यातून बनावट दारू अवैधरित्या महाराष्ट्रात अनेकदा आणल्याचे प्रकार घडत असतात. पोलीस वेळो-वेळी अशा वाहनांची तपासणी करून कारवाई करतात, तरीसुद्धा अशा प्रकारच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत.तशीच घटना ठाणे येथे घडली. ठाणे जिल्यातील नवीमुंबईतील तुर्भे येथे कोकण विभागीय राज्यउत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने अवैध मद्याची वाहतूक करण्याऱ्या वाहनाची तपासणी करून ७४,०८,६४० रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात हिंदू महिलेवर डॉक्टरांचा सामूहिक बलात्कार

‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या मोहम्मद अकबर लोन यांना माफी मागावी लागणार

तब्बल ६१ हजारवेळा विजा कडाडल्या; ओदिशात १२ मृ्त्युमुखी

बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा

दिनांक ४/०९/२०२३ रोजी कोकण विभागीय राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,सहआयुक्त सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक निलेश सांगडे यांना ठाणे जिल्ह्यातील बेलापूर रोड वरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व त्यांच्या सहकारी स्टाफने तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील बेलापूर ठाणे रोडवर नाकाबंदी लावत सापाळा रचला. त्यानंतर टाटा मोटर्स कंपनीचा एलटीपी ३११८ या मॉडेलचा बारा चाकी ट्रक क्रमांक एम. एच.१८-बी.ए.-६८२८ या वाहनाची तपासणी केली असता. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे ९१८ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपीना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

तेरसिंग धनसिंग कनोजे (३२) राहणार सेंधवा मध्यप्रदेश राज्य, नासिर अन्सार शेख (४५) राहणार सेंधवा मध्यप्रदेश राज्य, गुड्डू देवसिंग रावत (४५) रामखेडी मध्यप्रदेश राज्य , असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे असून तिघेही मध्यप्रदेश राज्यातील आहेत. यांच्याकडून अवैधरित्या बनावट मद्याचा वाहतूक करणारा ट्रक, त्यातील दारूचे ९१८ बॉक्स आणि २ मोबाईलसह ७४,०८,६४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ व संदीप जरांडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोज होलम तसेच जवान नारायण जानकर, केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत बनवे, नानासाहेब शिरसाट, भाऊसाहेब कराड,विजय पाटील सागर चौधरी यांनी पार पाडली. तर दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ हे पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version