मुंबईमधून मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत एका महिलेच्या घरात घुसून चोरी केली आहे. सोने आणि सहा लाख रोख घेऊन चार जण घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी त्या चौघांना अटक केली असून, रक्कम आणि सोने त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
एका इमारतीत एका महिलेला सोन्याचे नाणी घ्यायची असल्याने तिने एका सोनाराला घरी बोलावले होते. सोनार तिला सोन्याची नाणी दाखवत असतानाच तिच्या घरी चार इसम आले आणि त्यांनी त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. स्वतःची ओळख त्यांनी समाजसेवा शाखेतील पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले.
या चौघांनी महिलेला ती वेश्याव्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती असून, तिच्यावर गुन्हा दाखल केली जाईल, अशी त्या महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. महिलेने निर्दोष असल्याची विनंती केली मात्र, त्यांनी तिचे ऐकले नाही आणि तिच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली. महिलेच्या घरी एका कपात चार अंगठ्या आणि काही रोख रक्कम सापडली. चार लाख रोख रक्कम होती. ते चौघे दागिने, रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.
ते गेल्यावर त्या महिलेने पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूक आणि घुसखोरीचा एफआयआर दाखल करून घेत तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये आरोपीचे फोटो शोधले. चार आरोपी त्या महिलेच्या घरात घुसले आणि एक महिला आरोपी इमारतीच्या बाहेर उभी होती. पोलिसांच्या एका माहितीदाराने महिले आरोपीला ओळखले. त्यानंतर एक पोलीस पथक गोरेगाव येथे दाखल झाले आणि महिलेला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून २ लाख २५ हजार जप्त केले आहेत.
हे ही वाचा:
पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस
पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
पनवेलमध्ये पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी ही तक्रारदार महिलेच्या ओळखीची होती. तक्रारदार महिलेचे ३० ते ४० हजार रुपये थकीत त्या आरोपी महिलेकडे होते. तक्रारदार महिलेने ही रक्कम परत करण्यास उशीर केल्याने आरोपीने दरोडा टाकण्याचा कट केला.