हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार

हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, शिवमोग्गा जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष (वय २६) याची जिहादींनी हत्या केली. मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विनोद बन्सल म्हणाले की, कार्यकर्त्याच्या हत्येविरोधात २२ फेब्रुवारीला विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात येणार आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही विनोद बन्सल म्हणाले.

गृहमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद राहतील. मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या हत्येत सुमारे चार ते पाच जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाचा निर्णय मागे घ्या!’

भारताच्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेत्या कार्लसनला नमवले

मध्य प्रदेशात २०२३ला काँग्रेसची ठरणार का शेवटची निवडणूक?

सव्वाशे कोटी झाला खर्च, पण पालिकेचा सायकल ट्रॅक अर्धवट

तरुणाची हत्या ‘मुस्लीम गुंडांनी’ केल्याचे शिवमोग्गा येथील भाजप नेते आणि ग्रामीण विकास मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवमोग्गा येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गुंडागर्दी’ अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.

Exit mobile version