सांगलीत भाजपच्या उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची हत्या

पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

सांगलीत भाजपच्या उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची हत्या

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वत्र प्रचारसभांना वेग आला आहे. अशातच सांगली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सांगलीत खळबळ उडाली आहे.

सुधाकर खाडे हे आधी मनसेचे जिल्हाप्रमुख होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. माहितीनुसार, मिरज- पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मीरज- पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू

मुंबईत बांगलादेशी, रोहिंग्या वाढतील, २०५१ पर्यंत हिंदू राहतील ५४ टक्के

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

Exit mobile version