अरेरे ! एसटी कर्मचाऱ्याने बसमध्येच घेतला फास

अरेरे ! एसटी कर्मचाऱ्याने बसमध्येच घेतला फास

राज्य परिवहन महामंडळाची अवस्था दिवसेंदिवस दारुण होत चालली आहे. वेतनाचा प्रश्न चिघळत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. एका बसचालकाने तर बसमध्येच स्वतःला फास लावत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. तब्बल सहा लाखांचे कर्ज असल्यामुळे कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीवरून त्यांच्या आत्महत्येचे कारण कळले असे पोलिसांनी सांगितले.

संगमनेर स्थानकात पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) ही बस उभी होती. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.  त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर निघाले. आपण पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले पण थोड्यावेळाने बसचे वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसला. प्रवाशांना पकडून उभे राहता यावे म्हणून बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्यालाच दोरी बांधून तेलोरे यांनी आत्महत्या केली होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील हिंदू मुलीने रचला ‘हा’ इतिहास!

पवार आमचे नेते नाहीत, राष्ट्रवादीचा जन्मच खंजीर खुपसून झालाय! का म्हणाला, शिवसेना नेता

भारतीय लसवंतांविरुद्ध ब्रिटनचा वर्णद्वेषी निर्णय

… आणि बोटे छाटल्याच्या घटनेनंतर फेरीवाले पुन्हा अवतरले!

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरल्याचे आढळलेले नाही. पोलिसांनी ही माहिती तेलोरे यांच्या कुटुंबियांना कळविली असून ते संगमनेरला निघाले आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

Exit mobile version