बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वर्षभरानंतरही अनेक खुलासे होत आहेत. सुशांतचे निकटवर्तीय असलेले अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे आले आहेत. सुशांतचा बॉडीगार्ड सागर सोहिल काल साक्षीदार झाला. येत्या काही दिवसात सुशांतचे काही मित्रही साक्षीदार होण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसात सुशांत सिंग राजपूतशी निगडीत ड्रग्ज प्रकरणात अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे येत आहेत. गेल्या आठवड्यात सुशांतचे नोकर नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे साक्षीदार झाले. तर सुशांतचा बॉडीगार्ड सागर सोहिल काल साक्षीदार झाला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सागरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मालाडमध्ये एका ठिकाणी त्याची अनेक तास चौकशी झाली. ही चौकशी मध्यरात्रीपर्यंत चालली होती. यानंतर त्याला काल सकाळी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा त्याने आपल्याला साक्षीदार व्हायचं असल्याचं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर त्याला किल्ला कोर्टातील एका न्यायाधीशांच्या समोर उभं करण्यात आलं. तिथे सागर याचा सीआरपीसी १६४ नुसार जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
अभिनेता सुशांत सिंग याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात अनेक व्यक्ती राहत होत्या. मात्र, त्याने आत्महत्या केल्यानंतर बहुतांश जण निघून गेले. कुणी परदेशात गेलं तर कुणी देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी या सर्वांना शोधायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?
पॅरिसमध्ये विमानात स्फोटकं सापडल्याने खळबळ
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार, काका-पुतण्यांपुढे माना डोलावत
आधी सिद्धार्थ पिठाणी याला अटक करण्यात आली. त्यानंतर केशव आणि नीरज यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली. यानंतर बॉडीगार्ड सागरला साक्षीदार करण्यात आलं. याच पद्धतीने अनेक व्यक्तींची नावं एनसीबी अधिकाऱ्यांच्या तपासात उघड झाली आहेत. त्यांना लवकरच समन्स बजावून चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे.