श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

गुनाथिलकाला अटक केल्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

श्रीलंकेचा प्रसिद्ध फलंदाज दानुष्का गुनाथिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. गुनाथिलकाला अटक केल्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी दानुष्का गुनाथिलकाला सिडनीतून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला. एका २९ वर्षीय महिलेने त्याच्यावर संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेची गुनाथिलका यांना एका प्रसिद्ध डेटिंग ऍपद्वारे भेट झाली होती.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणतिलकाला बुधवारी संध्याकाळी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला इंग्लंडविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे श्रीलंका उपांत्य फेरीतून बाहेर पडली. या सामन्यानंतर दानुष्काला अटक करण्यात आली आहे. पात्रता फेरीत दुखापतीमुळे दानुष्क आधीच संघाबाहेर होता.

हे ही वाचा:

हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

२०१८ मध्येसुद्धा त्याला एका बलात्काराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. त्यानंतर त्याला संघातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्या पीडित महिलेने दानुष्काच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आणि त्याचवेळी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दानुष्काच्या मित्राला अटक केली. दनुष्का गुनाथिलका यांच्यावर त्यावेळी महिलेने आरोप केले नव्हते.

Exit mobile version