22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामालॉकडाउनच्या काळात नवे स्पुतनिक स्कॅम

लॉकडाउनच्या काळात नवे स्पुतनिक स्कॅम

Google News Follow

Related

मुंबईत लॉकडाउनच्या काळात नवनव्या क्लृप्त्या लढवून लोकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. वेगवेगळ्या ऑनलाइन स्कीमच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करून त्यांना गंडवण्याचे प्रकार होत असतात. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत प्रत्येकाला असलेली लशीची गरज आणि वाढती मागणी लक्षात घेता आता परदेशातून आलेली स्पुतनिक लस उपलब्ध करून देणारी नवी स्कीम बाजारात आली आहे का, अशी शंका घेण्यास वाव आहे. अशी स्कीम राबवणारे भुरटे चोर स्पुतनिक लस घरपोच देण्याचे आश्वासन देत लोकांना जाळ्यात ओढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. या लोकांनी काही बड्या उद्योगपतींना संपर्क करून आगाऊ रकमेच्या मोबदल्यात झटपट लस उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखविले असल्याची माहिती ‘न्यूज डंका’ला मिळाली आहे.

हे ही वाचा:

११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी

भारतातील पेटत्या चिता पाहून चीनला उकळ्या

बजाजची इलेक्ट्रिक दुचाकी लवकरच बाजारात?

‘आम्ही इथे इंजेक्शन देऊन मारले आहेत’

एकीकडे भारतात लसीकरणावरून बरेच वादंग निर्माण झालेले असताना परदेशातून येणारी स्पुतनिक व्ही ही लस विकत मिळू लागल्याची चर्चा आहे. लसींची उपलब्धता ही फक्त सरकार किंवा पालिकेच्या माध्यमातूनच होते आहे. तीही त्यांच्याकडे लस घेण्यासाठी नोंद केल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येते. त्याशिवाय, व्यक्तिगत पातळीवर कुणीही लस किंवा लसींचा साठा घेऊ शकत नाही. मात्र स्पुतनिकच्या बाबतीत उलटेच चित्र दिसते आहे. या लसीचा साठा किंवा लस हवी असल्यास ५० टक्के आगाऊ रक्कम भरा आणि सहा दिवसांत लसींचा साठा मिळवा अशी जाहिरात केली जाऊ लागली आहे. अर्थात, सीमाशुल्क खात्याकडून त्याला मान्यता मिळाली की, ती सहा दिवसांत उपलब्ध होऊ शकेल, असा दावा केला जात आहे. लसीचा साठा मिळाल्यावर उरलेली ५० टक्के रक्कम भरा अशीही मागणी केली जाते. या प्रत्येक लशीची किंमत करांसह १६ डॉलर इतकी आहे.
सध्या भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी उपलब्ध आहेत. त्यांचे वितरण केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना केले जात आहे. नुकतीच कोव्हिशिल्डचे उत्पादक असलेल्या सिरमचे प्रमुख आदर पुनावाला यांना लसीचा पुरवठा करण्याच्या धमक्या आल्याचे वृत्त चांगलेच चर्चेत होते. अनेक बड्या नेत्यांनी, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, उद्योगपतींनी लसी देण्यासंदर्भात दबाव आणल्याचे पुनावाला यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. स्पुतनिकच्या बाबतीत ही वेगळीच चर्चा समोर येऊ लागली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा