श्रद्धासारखी परिस्थिती मुलींवर ओढवू नये म्हणून विशेष पथक

भाजपा नेते मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

श्रद्धासारखी परिस्थिती मुलींवर ओढवू नये म्हणून विशेष पथक

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी देशभरात हळहळ व्यक्त केली जातं आहे. हत्येचे पुरावे शोधण्यासाठी पोलीस दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. याचदरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगाला एक पथक तयार करण्याची सूचना केली आहे. ज्याचा उद्देश कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांना मदत करणे हा असणार आहे.

आपले कुटुंब सोडून गेलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी त्यांनी राज्य महिला आयोगाला एक पथक तयार करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली आहे. एएनआयशी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, मी राज्य महिला आयोगाला एक पथक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जेव्हा एखादी मुलगी १८ वर्षे पूर्ण करते तेव्हा तिला तिचे कुटुंब किंवा पोलिस थांबवू शकत नाहीत. जेव्हा ती तिच्या कुटुंबाशी लढते तेव्हा असे लग्न करते आणि निघून जाते. तिला माहित आहे की तिला नंतर तिच्या कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळणार नाही, अशा मुलींना मदत करण्यासाठी हे पथक तयार केले जणार आहे. इतर मुलींसोबत असे घडू नये याची खात्री करण्यासाठी, हे पथक काम करेल. त्यांच्या कुटुंबापासून दूर गेलेल्या मुलींना गरज असल्यास मदत आणि संरक्षण देईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

राहुल गांधी माफी मागा, अन्यथा मुंबईत प्रवेश नाही!

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाची १३ हाडे सापडली आहेत. मात्र, पोलिसांनी अद्यापही श्रद्धाचे डोके सापडलेले नाही. तसेच मोबाईलही जप्त करण्यात यश आलेले नाही. ज्या करवतीने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तेही सापडलेले नाही.

Exit mobile version